Sion Hospital : मुलांचे मानसिक आरोग्य निरोगी असावे, चर्चास्त्रात भारतीय मानसोपचार सोसायटीच्या तज्ज्ञांचे मत

116
शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मुलांनी सतत नवीन काहातरी करत राहिले पाहिजे. मुलांच्या विचारशक्तीत नावीन्यता हवी, असे मत ‘भारतीय मानसोपचार सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. विनय कुमार यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या शीव रुग्णालयात ‘शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
शीव रूग्णालयात मुंबई मानसोपचार सोसायटी, भारतीय मानसोपचार सोसायटी आणि स्कूल मेंटल हेल्थ टास्क फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी मुंबई मानसोपचार सोसायटीचे अध्यक्ष डॉ‌. अविनाश देसूसा, डॉ. केर्सी चावडा यांच्यासह तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. मुलांमध्ये सर्जनशीलता वाढायला हवी. मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहिले पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांची देखील तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. पालकांनी मुलांसोबत सतत संवाद साधयला हवा. मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत. मुलांच्या प्रगतीसाठी त्यांचे मानसिक आरोग्य चांगलं राहणं ही अतिशय गरजेची बाब आहे असे मत डॉ. विनय कुमार यांनी मांडले.
संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळांमधील मुलांच्या मानसिक आरोग्यबाबत चर्चा व्हावी आणि यातून मुलांच्या मानसिक आरोग्यसाठी ठोस उपायोजना कारणासाठी या चर्चासत्राला राज्यभरातील शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यभरातील जवळपास ६०० पेक्षा अधिक शाळांनी या चर्चासत्रात सहभागी नोंदविला.
मुलांना रोजच्या रोज व्यायाम, पोहणे, शारीरिक खेळ, बौद्धिक खेळ, वाचन, चित्र काढणे यासोबतच नवनवीन गोष्टी शिकणे फार महत्त्वाचे असते. कोरोनंतरचे शिक्षण, लैंगिकता, किशोरावस्था आणि शालेय मानसिक आरोग्याच्या संबंधात पौगंडावस्थेतील बाबी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर देखील या चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.