मानसिक आजाराने त्रस्त पतीने पत्नीवर हल्ला करून केली आत्महत्या

131

‘बायपोलर डिसऑर्डर’ या मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ६४ वर्षीय इसमाने पत्नीवर चाकूने हल्ला करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री मुलुंड पूर्व येथे घडली. या घटनेत पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी नवघर पोलिसानी या घटनेत मृत झालेल्या जेष्ठ नागरिकावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पलानी शिवन कोणार्क यादव (६४)असे मृताचे नाव आहे. पलानी हे महानगर टेलिफोन निगम मधून २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. पलानी हे पत्नी कविता (५४), मुलगी धान्या आणि मुलगा यांच्यासह मुलुंड पूर्व गव्हाण पाडा येथील ‘डेस्टिनी हाईट्स’ ए विंग या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर राहण्यास होते.

पलानी यांना २०१९ पासून ‘बायपोलर

‘डिसऑर्डर’ हा मानसिक आजार असून त्यांच्यावर तळोजा येथील रिहाब सेंटर या ठिकाणी उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. पलानी हे यांना महिन्याभरा पूर्वीच तळोजा येथील रिहेब सेंटर मधून घरी आणले होते, त्यानंतर देखील त्यांना अधूनमधून मानसिक नैराश्याचे झटके येत होते. गुरुवारी सायंकाळी मानसिक नैराश्यातून पलानी याने पत्नी कविता यांच्यावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रात्री कामावर आलेली मुलगी धान्या उघडकीस आला. मुलीने आईला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, दरम्यान या घटनेची माहिती नवघर पोलिसाना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेडरूमचे दार तोडून आत प्रवेश केला असता पलानी हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. पलानी यांना पोलिसांनी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नवघर पोलिसांनी पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी मृत पलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयवंत संपकाळ यांनी दिली.

(हेही वाचा शरद पवार माझ्यासाठी आधारस्तंभ; संजय राऊत यांची कबुली )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.