‘मेरा स्टेशन मेरा अभियान २०२३’ अंतर्गत (Sangli Railway Station) मोठ्या रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रात सर्वात स्वच्छ आणि सुंदर रेल्वे स्थानकाचा मान सांगली स्थानकाला मिळाला आहे, तर छोट्या स्थानकामध्ये सातारा जिल्ह्यातील वाठार स्थानकानेही या अभियानात बाजी मारली आहे.
मध्य रेल्वे झोनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सांगली रेल्वे स्थानकाने नेहमीच स्वच्छतेबाबत पहिला क्रमांक पटकावला आहे. ही माहिती मध्य रेल्वेच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आली होती. सांगली रेल्वे स्थानकाची काही छायाचित्रेही सोशल माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. दरवर्षी सुमारे १३ लाख प्रवासी सांगली रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात, पण सांगली रेल्वे स्थानकावर कधीही अस्वच्छता दिसली नाही, अशी माहिती स्थानक व्यवस्थापक विवेककुमार पोदार यांनी दिली आहे.
(हेही वाचा – Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे पाकिस्तान कनेक्शन ? महत्त्वाची माहिती समोर)
स्थानकावर स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन स्वच्छता अभियान आणि विविध योजना राबवून सांगली स्थानकाला महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचा मान मिळवून देण्यात स्थानक व्यवस्थापक विवेककुमार पोदार यांनी योगदान दिले आहे. रेल्वे स्थानकाच्या शंभराहून जास्त कर्मचाऱ्यांचेही यामध्ये योगदान असल्याची माहिती नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community