राज्यात सातत्याने उन्हाचा पारा वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चाळीशीहून अधिक आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून नागरिक बेहाल झाले आहेत. विदर्भात ४५ अंश सेल्सियसहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. दरम्यान मुंबई, पालघर, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्राला देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
अकोला ४५.५ अंश, अमरावती ४५.४ अंश, वर्धा ४४.९ अंश, नागपूर ४४.३ अंश आणि यवतमाळमध्ये ४३.५ अंशाची नोंद झाली आहे. अशाप्रकारे बहुतांश जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट असल्यामुळे लोकं दुपारी घराबाहेर निघण्याचे टाळताना दिसत आहे. दरम्यान उष्णतेमुळे राज्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा – Heat Wave : वाढत्या उष्णतेचे होतायेत नकारात्मक परिणाम; कोणते आजार वाढले? )
छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताने एक जण दगावला
छत्रपती संभाजीनगरमधीत तापमानात वाढ होऊन ४१ अंशाहून अधिक येथील तापमान होते. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात आडूळ येथे उष्माघाताने बंडू मदन वाघ (३७) नावाचा व्यक्ती दगावला. बंडू वाघ दुपारी २.३० वाजता घरी जात असताना रस्त्यात भोवळ येवून कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community