Meta AI : मेटा कंपनीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजरसाठी आता एआय प्रोग्रामची मदत

Meta AI : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत मेटा कंपनी ओपन एआय, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलशी स्पर्धा करत आहे.

116
Meta AI : मेटा कंपनीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजरसाठी आता एआय प्रोग्रामची मदत
  • ऋजुता लुकतुके

फेसबुकची मालकी असलेली मेटा कंपनी भारतात त्यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सोशल मीडिया साईटना ते मैटा एआयच्या काही सुविधा सुरुवातीला मोफत देणार आहेत. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि वॉट्सॲप वापरणाऱ्या ग्राहकांना मेटा एआयचा हा चॅटबॉट वापरता येईल. सोमवारी २४ जूनपासूनच भारतात हा चॅटबॉट कार्यरत झाला आहे. (Meta AI)

मेटा कंपनीचा सगळ्यात मोठा ग्राहक वर्ग भारतात आहे. त्यांच्या सगळ्या सोशल मीडिया साईट मिळून १ अब्ज भारतीय मेटाचे ग्राहक आहेत आणि यावर्षी एकदा मेटाने भारतातच एआय चॅटबॉक्सचं मोठं टेस्टिंग केलं होतं. तर प्रतिस्पर्धी कंपनी गुगलनेही गेल्याच आठवड्यात भारतातील आपल्या मोबाईल फोन ग्राहकांना जेमिनीच्या फोनसाठी बनलेल्या चॅटबॉटची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एआय क्षेत्रात आता आघाडीच्या टेक कंपन्यांमध्ये स्पर्धा दिसत आहे. गुगलची सेवा सात भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. तर सुरुवातीला मेटा एआय फक्त इंग्लिशमध्ये वापरता येऊ शकेल. (Meta AI)

(हेही वाचा – Congress ने लोकशाहीला काळीमा फासला; अधिवेशनापूर्वी PM Modi यांची घणाघाती टीका)

या प्रोग्रामने केला चॅटबॉक्स विकसित

मेटा कंपनीने अलीकडेच meta.ai ही वेबसाईट लाँच केली आहे आणि वेबसाईटच्या माध्यमातून कंपनीचे ग्राहक एआय चॅटबॉच वापरू शकतील. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, सिंगापूर, द आफ्रिका, युगांडा आणि झिंबाब्वे या देशांमध्ये मेटाने आपला मेटाआय चॅटबॉक्स सुरू केला आहे. कंपनीच्या लॅमा ३ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणाऱ्या प्रोग्रामनेच हा चॅटबॉक्स विकसित करण्यात आला आहे. (Meta AI)

मेटा एआय टेक्स्ट, इमेज तयार करणं, प्रूफ रिडिंग करणं, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर, कविता तसंच अगदी फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टोरीजही तयार करू शकतील. मेटाच्या सोशल मीडिया साईटना अधिक चांगला सर्च पर्यायही मेटा एआय देणार आहे. (Meta AI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.