मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Elections) केलेल्या वक्तव्याबद्दल मेटा इंडियाने बुधवार, १५ जानेवारी रोजी माफी (Metta India apologized) मागितली आहे. झुकरबर्ग यांचे निवडणुकीबाबातचे विधान हे “अनवधानाने झालेली चूक” असल्याचे कंपनीने म्हटले आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी दिला होता इशारा सोशल मीडिया कंपनी META ने आपले सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. झुकेरबर्गने एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, कोरोनानंतर जगातील अनेक देशांमध्ये विद्यमान सरकारे पडली. भारताच्या लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचा पराभव झाला. यावरून जनतेचा सरकारवरील कमी होत चाललेला विश्वास दिसून येतो. या विधानानंतर संसदेच्या आयटी समितीचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey) यांनी या वक्तव्याबद्दल कंपनीने माफी मागावी, असे म्हटले होते. अन्यथा आमची समिती त्यांना मानहानीची नोटीस पाठवेल. असा इशारा दिला होता.
जो रोगनच्या पॉडकास्टमध्ये मार्क झुकरबर्ग म्हणाले होते की, सरकारांचा हा पराभव दर्शवितो की कोविड महामारीनंतर लोकांचा विश्वास कमी झाला आहे. वाढती महागाई, साथीच्या आजाराशी संबंधित आर्थिक धोरणे आणि सरकारांनी कोविड-१९ ला कसे हाताळले यामुळे लोकांचा विश्वास कमी झाला आहे, असेही ते म्हणाले होते. आम्ही दिलगीर आहोत…
मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी बुधवारी सांगितले – हा निष्काळजीपणा होता. मार्क झुकेरबर्ग म्हणाले की, कोरोनानंतर अनेक विद्यमान सरकारे पडली, परंतु भारतात असे झाले नाही. निष्काळजीपणामुळे झालेल्या या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. META साठी भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे.
मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यक्त केली हाेती विधानावर नाराजी
आयटी आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव (Minister Ashwini Vaishnav) यांनीही एक्सवर पोस्ट करताना Meta ला टॅग केले. त्यांनी लिहिले की, या प्रकरणात, अश्विनी वैष्णव यांनी आधीच मार्क झुकरबर्ग यांना उत्तर दिले होते. त्यांनी एक्सवर पोस्टमध्ये लिहिले की, “जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतात २०२४ मध्ये निवडणुका झाल्या ज्यामध्ये ६४ कोटी लोकांनी भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या एनडीए सरकारवर भारतातील जनतेने विश्वास दाखवला. कोविडनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह जगातील बहुतेक सत्ताधारी सरकारे पराभूत झाली आहेत, हा मार्क झुकरबर्गचा दावा चुकीचा आहे.