- ऋजुता लुकतुके
सेलिब्रिटींच्या डीपफेक तंत्रज्ञान (Deepfake technology) वापरून बनवलेल्या व्हिडिओंनी अलीकडे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यातून तुमचे फोटो आणि व्हिडिओ यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. त्यानंतर आता मेटा कंपनीनं पहिलं पाऊल उचलताना असे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वापरुन बनवलेले व्हिडिओ आणि फोटो ओळखून ते लेबल करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे लोकांना मेटावर बघत असलेला व्हिडिओ किंवा फोटो फेक असेल तर लगेच कळेल. (Meta to Label AI Images)
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेडवर असे कुठलेही फोटो, व्हिडिओ हे नियमितपणे लेबल करण्यात येतील, असं कंपनीचे एक अधिकारी निक क्लेग यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. कंपनीने त्यांच्या स्वत:च्या एआय टूलने (AI Tool) बनवलेला मजकूर कंपनी आधीपासूनच लेबल करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (Meta to Label AI Images)
(हेही वाचा – Ajit Pawar यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल)
हे आहे मेटा कंपनीचं धोरण
आता कंपनीला ओपनएआय, मायक्रोसॉफ्ट, अडोब, मिडजर्नी, शटरकॉक, गुगल या कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) चालणाऱ्या टूलनी बनवलेले व्हिडिओ ओळखणारी यंत्रणा आता उभी करायची आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वापरुन बनवलेल्या इमेज आपल्याला नक्कीच ओळखता येतील. पण, ऑडिओ आणि व्हिडिओ खात्रीलायकरित्या ओळखण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानात थोडी प्रगती करावी लागेल,’ असं क्लेग यांनी अलीकडेच रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
त्यामुळेच सुरुवातीच्या टप्प्यात, लोकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वापरून बनवलेले व्हिडिओ स्वत:च लेबल करावेत असं आवाहन मेटा कंपनीकडून ग्राहकांना करण्यात येणार आहे. आणि त्याशिवाय लेबलिंगचं टूल स्वत: सुरू करण्यावरही कंपनी काम करत आहे. अर्थात, फेक व्हिडिओ आणि इमेजच्या बाबतीत कंपनीचं धोरणही यातून स्पष्ट होत आहे. असा फेक मजकूर साईटवर काढून टाकण्यापेक्षा तो लेबल करावा असंच कंपनीचं धोरण आहे. (Meta to Label AI Images)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community