Meta Layoff: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने १० हजार कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

109

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने पुन्हा एकदा १० हजार कर्मचाऱ्यांना काढू टाकल्याचे समोर आले आहे. यापूर्वीच मेटा कंपनीने ११ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. दरम्यान मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्गने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आपण आपल्या समुहाच्या संख्येत १० हजाराने कपात करणार आहोत. यातील ५ हजार अशी पद आहेत, ज्यासाठी आजवर कोणतीही भरती करण्यात आलेली नाही, ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

मेटामधील या कपातीला कंपनीतील जारी झालेल्या पुनर्रचनाशी जोडून पाहिले जात आहे. कंपनी आपल्या संस्थेच्या संरचनेत मोठा बदल करत आहे. शिवाय कमी प्राधान्याचे प्रकल्प रद्द करत आहे. तसेच कंपनी नोकरभरतीही कमी करणार आहे. मेटामधील १० हजार कर्मचाऱ्यांच्या काढल्याच्या वृत्तानंतर मेटाच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. प्री-मार्केट ओपनिंगमध्ये मेटा शेअर्समध्ये २ टक्क्यांची उसळी दिसत आहे.

कर्मचाऱ्यांना काढण्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन टेक कंपन्यांवरील गंभीर संकट. त्यावर मेटाच्या वाईट परिणामांमुळे समस्या वाढली आहे. मेटाची जाहिरात महसूल कमी झाला आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. २००४ मध्ये फेसबुकच्या स्थापनेच्या १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते.

(हेही वाचा – मानवी मनासारखे काम करणार बायोकंप्युटर! जाणून घ्या अद्भूत सत्य)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.