१७ ते २० नोव्हेंबरदरम्यान सिंह तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव (Meteor Shower) होणार आहे. पहाटेच्या सुमारास याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आकाशात चार दिवस आतषबाजी पहायला मिळणार आहे.
उल्कावर्षावाची तीव्रता, निश्चित तारीख, वेळ या गोष्टी खात्री सांगता येत नाही. घराबाहेर आणि भराभर उल्का पडतांना दिसल्या अशी अवास्तव कल्पना कोणी करु नये. उल्काचे निरीक्षण आणि त्याच्या नोंदीची खगोल जगतात खूप गरज आहे.
(हेही वाचा – Assembly Election : हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात मत विभाजनाची भीती; अपक्षांनी केली डोकेदुखी)
या उल्कावर्षावाला (Meteor Shower) ‘लिओनिड्स’ हे नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असतांना एकाद्यावेळी क्षणार्धात एकादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपणास दिसते या घटनेस तारा तुटणे असे म्हणतात. ही एक खगोलीय घटना आहे एखाद्यावेळी उल्का आपल्याला पडताना दिसते, या संदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा आहे. परंतू अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कोठेही आधार नाही.
सिंह तारकासमुहातून होणारा हा उल्कावर्षाव (Meteor Shower) ‘टेम्पलटटल’ या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो व हा धूमकेतू ३३ वर्षांनी सुर्याला भेट देतो. सर्व खगोलप्रेमिंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य पाहावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community