Meteorology Department: राज्यासह देशभरात थंडीचा कडाका, काही ठिकाणी पावसाची शक्यता

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.

130
Meteorology Department: राज्यासह देशभरात थंडीचा कडाका, काही ठिकाणी पावसाची शक्यता
Meteorology Department: राज्यासह देशभरात थंडीचा कडाका, काही ठिकाणी पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातवरणात सध्या अनेक बदल होत आहेत. राज्यातील वातावरण कोरडे असून राज्यासह देशभरात थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून (Meteorology Department) वर्तवण्यात आली आहे. बहुतेक जिल्ह्यातील तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होणार असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली आहे.

२३ नोव्हेंबरपर्यंत तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार आहे तसेच देशात काही ठिकाणी पाऊस पडण्याचीदेखील शक्यता आहे. २३ नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेनं येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढणार आहे. यामुळे दक्षिम महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होणार आहे, तर २४ नोव्हेंबरला दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे.

(हेही वाचा – Bogus Doctor: रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर पोलिसांकडून कारवाई )

दिल्ली-एनसीआर भागात 21 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण असू शकते. यामुळे दिल्लीतील किमान तापमानात घट होईल. दिल्ली-एन. सी. आर. च्या रहिवाशांना येत्या काही दिवसांत थंडीच्या लाटेचा अनुभव घ्यावा लागेल. सकाळी थंडी पडण्याची शक्यता असल्याने रहिवाशांना दिवस आणि रात्री थंडीसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला जातो. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे तसेच या आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान 11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची सूचनाही हवामान विभागाने दिली आहे.

दिल्लीतील नागरिकांना वायू प्रदूषणापासून दिलासा…

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबरपासून दिल्लीत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या जोरदार वाऱ्यामुळे दिल्ली आणि एन. सी. आर. च्या नागरिकांना वायू प्रदूषणापासून दिलासा मिळेल. हवेची गुणवत्ता सुधारेल. डोंगराळ भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुग्राममध्ये 242, गाझियाबादमध्ये 275, नोएडामध्ये 252, ग्रेटर नोएडामध्ये 232 आणि फरिदाबादमध्ये 318 एक्यूआय (Air quality)होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.