५ ते ११ जानेवारीदरम्यान रात्रीच्या तापमानात (Meteorology Department) घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य भारतातील काही भागांमध्ये थंडीची लाट येऊ शकते. दिवसादेखील तापमान नेहमीच्या सामान्य तापमानापेक्षा कमी राहील. यामुळे विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तर भाग, उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात थंडीची लाट राहिल, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने सोमवारी सांगितले की, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या काही भागांमध्ये पुढील २ दिवसांत थंडीची तीव्र लाट येऊ शकते. वायव्य आणि पूर्व भारताच्या काही भागात पुढील ३ दिवस अति दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती हळूहळू कमी होईल.
(हेही वाचा – Chandrakant Patil : राज्यात ४५ जागा नक्की जिंकणार, चंद्रकांत पाटील यांचा दावा)
जोरदार पावसाची शक्यता…
जानेवारी २०२४ मध्ये उत्तर भारतातील काही भाग वगळता देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पुढील ३-४ दिवसांत तामिळनाडू, केरळचा दक्षिण भाग आणि लक्षद्विपच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. लक्षद्वीप आणि केरळमध्ये सोमवार ते गुरुवार जोरदार पावसाची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
हेही पहा –