मेट्रोतून उतरल्यानंतर प्रवाशांना इच्छित स्थळी जाणे सोपे झाल्यास मेट्रोला प्रतिसाद मिळेल असा विचार करून एमएमआरडीएने बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्पाची संकल्पना मांडली. हा प्रकल्प सर्व मेट्रो मार्गिकांच्या स्थानकांमध्ये राबविण्याचा निर्णय एमएमआरडीएने (MMRDA) घेतला आहे. त्यानुसार आता ‘मेट्रो २ ब’मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
‘अंधेरी पश्चिम – मानखुर्द मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील मेट्रो स्थानकात उतरल्यानंतर पुढे इच्छित स्थळी जाणे सोपे व्हावे यासाठी बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्प (मल्टि मॉडल इंटिग्रेशन प्लॅन) राबविण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) घेतला आहे.
(हेही वाचा – Central Railway : सीएसएमटी -धुळे दैनिक एक्सप्रेस सुरू, मध्य रेल्वेकडून वेळापत्रक जाहिर )
‘मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील २० स्थानकांबाहेर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून बेस्ट, रिक्षा, टॅक्सी सेवा एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. २३.६४३ किमी लांबीच्या या मार्गिकेवरील २० स्थानकांबाहेर २५० मीटर त्रिजेच्या आत बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण प्रकल्पाअंतर्गत बेस्ट,रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक व्यवस्थेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानक गाठणे वा मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी पोहचणे सोपे होणार आहे. ही सुविधा २०२५ पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
हेही पहा –