Metro Construction Collapse : चेंबूरमध्ये मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले; रहिवासी परिसरात मोठी वाहतूक कोंडी

54
Metro Construction Collapse : चेंबूरमध्ये मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले; रहिवासी परिसरात मोठी वाहतूक कोंडी

मुंबईतील चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम चालू आहे. सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळून मेट्रोचा मार्ग जातो. या मार्गावर मेट्रोचे खांब उभारण्याचे काम चालू आहे. वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचे अर्धवट बांधकाम ३१ जानेवारीच्या पहाटे रहिवासी परिसरातच कोसळले. (Metro Construction Collapse)

(हेही वाचा – Ashwini Vaishnav : DeepSeek आणि ChatGPTला टक्कर देण्यासाठी भारत तयार करणार स्वतःचा AI चॅटबॉट ; भारतीय भाषांना असेल प्राधान्य!)

सळई आणि काँक्रीटच्या साहाय्याने हे खांब उभारले जात आहेत. २० फूट उंचीच्या सळया रोवून खांब उभारणीचं काम चालू आहे. एक अर्धवट खांब सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कोसळला. हा खांब सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर आणि मोकळ्या जागेत कोसळला, त्यामुळे मोठी हानी टळली असली, तरी या घटनेमुळे परिसरात भितीचे वातवरण पसरले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. हे बांधकाम थोडे आजूबाजूला पडले असते, तर फार मोठी जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेमुळे शीव-ट्रॉम्बे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. (Metro Construction Collapse)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.