मुंबईकरांना आणखी एक मेट्रोचं (Metro) गिफ्ट मार्च अखेरपर्यंत मिळू शकतं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने त्यांच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो 3 प्रकल्पाच्या (Colaba-Bandra-Seepz Underground Metro 3 Project) बीकेसी – कुलाबा टप्प्याबाबत मोठी माहिती दिली आहे. या टप्प्याचे आतापर्यंत ९३.१ टक्के काम पूर्ण झालं आहे. मार्च 2025 अखेर प्रवासी सेवेसाठी ते सुरू करण्याचं लक्ष्य आहे. महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये या विस्ताराचा समावेश करण्यात आला होता. (Metro Line 3)
लवकरच तपासणीची तयारी सुरू होईल
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) या महत्त्वाच्या टप्प्यात असलेल्या बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्यामुळे लवकरच मेट्रो सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. MMRC अधिकाऱ्यांनी सांगितले की ‘फेज 2A’ च्या बांधकामासोबतच त्याची रचना आणि पद्धतशीर कार्ये देखील अंतिम केली जात आहेत. सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत आणण्यासाठी आवश्यक असलेली अंतिम मंजुरी मिळेल. या टप्प्याचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळू शकेल.
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध; DCM Eknath Shinde यांचे प्रतिपादन)
मुंबई मेट्रो मार्गाची म्हणजे एकालाइनची एकूण लांबी 33.5 किलोमीटर आहे. या मार्गावर एकूण 27 स्थानके आहेत. हे कॅफे परेड BKC आणि आरे JVLR ला जोडते. 12.69 किमी लांबीच्या या विभागाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये फेज-1 मध्ये केले होते. या मार्गाचा आणखी एक भाग मार्चमध्ये सुरू होणार आहे. हा रस्ता बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत आहे. आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो गेल्याने बीकेसी ते वरळी दरम्यान मेट्रोची जोडणी होणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community