मुंबईत कुलाबा ते अंधेरी सिप्झ अशाप्रकारे मुंबई मेट्रो रेल्वे ३ प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पांच्या भुयारीकरणाचे काम ९० टक्क्यांच्यावर जाऊन पोहोचले आहे, तर प्रकल्पांचेही काम ६० टक्क्यांच्यापुढे गेले आहे. परंतु आता या प्रकल्पाची शेपूट आणखी ताणली जाणार असून हा मार्ग कुलाब्याच्या पुढे नेव्हीनगरपर्यंत नेला जाणार आहे.
मुंबईतील कुलाबा-वांद्रे- सिप्झ या मेट्रो मार्गिका क्रमांक ३ या प्रकल्पाचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगर होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. त्यामुळे या मार्गाचा प्रारंभ हा कुलाब्याऐवजी आता नेव्हीनगर नगरपर्यंत होणार आहे.
( हेही वाचा : रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक )
विविध तंत्रांचा वापर करून स्थानके बांधणार
आजवर सुरु असलेल्या मेट्रो स्थानकांच्या बांधकामांतर्गत भुयार आणि भूमिगत स्थानकांच्या निर्मितीचा समावेश आहे. भुयारी मार्ग हे टीबीएमद्वारे केली जात आहे, तर स्थानकांची निर्मिती कट अँड कव्हर व न्यू ऑस्ट्रियन पध्दतीचा वापर करून केली जात आहेत. एकूण २६ भूमिगत स्थानकांपैंकी १९ स्थानके कट अँड कव्हर पध्दतीने तर उर्वरीत ७ स्थानके एनएटीएम आणि सी अँड सीच्या विविध तंत्राचा वापर करून बांधली जात आहे.
काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर
या मेट्रो व्यतिरिक्त पुणे येथील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाझ ते रामवाडी, मुंबई मेट्रो मार्ग २ व तसेच नवी मुंबईतील बेलापूर ते पेंढार या मेट्रो मार्गाचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community