आता पुण्याची वाहतूक कोंडी संपणार! कशी ते वाचा…

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) मेट्रोचे जाळे विस्तारण्याची तयारी महा मेट्रोने सुरू केली आहे. यासाठी नवीन चार मार्गांवर मेट्रो प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी महामेट्रोने पीएमआरडीएला केली आहे.

हे आहेत ‘ते’ मार्ग!

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, वनाज ते रामटेकडी आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या तीन मार्गांचे काम सध्या सुरू असून, आता पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या चार मेट्रो प्रकल्पांची शिफारस करण्यात आली आहे. स्वारगेट ते खडकवासला दरम्यान नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), वारजे ते स्वारगेट, वाघोली ते पवार वस्ती (हिंजवडी) आणि चांदणी चौक ते हिंजवडी असे मार्ग आहेत.

या मोठ्या प्रकल्पांचाही समावेश

त्यासाठी पीएमआरडीएने करून घेतलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील मार्गांची माहिती महामेट्रोने मागवली आहे. या माहितीच्या अधारे प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गांचे सर्वेक्षण करून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. पीएमआरडीएने सुमारे 7 हजार 200 चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे काम ‘एल ॲण्ड टी’ कंपनीकडून करून घेतले. त्यामध्ये मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, रिंगरेल आणि बीआरटी, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, नवीन बस डेपो, रेल्वे स्टेशनचे अद्ययावतीकरण, नवीन रस्ते विकसित करणे या मोठ्या प्रकल्पांसह प्रमुख चौकांचे रुंदीकरण असा सुमारे 54 हजार 601 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस प्राधिकरणाला केली आहे.

 ( हेही वाचा :एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरताय, मग ‘ही’ बातमी वाचाच…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here