मुंबईतील मेट्रो स्थानके पूरमुक्त असणार! पाण्याचा निचरा करण्यासाठी विशेष यंत्रणा

142

मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो कुलाबा ते सिप्झपर्यंत धावणार आहे. या मेट्रोची सर्व स्थानके पूरमुक्त असणार आहेत. अतिवृष्टी झाली तरीही मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. भूमिगत मेट्रोची स्थानके जमिनीच्या १.५ मीटर खाली बांधण्यात आली आहेत आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. एमएमआरसीने मेट्रो ३ च्या भूमिगत स्थानकात पावसाचे पाणी साचले तर त्याचा उपसा करण्यासाठी सुद्धा पंप लावले आहेत.

( हेही वाचा : मध्य रेल्वे मार्गावर १५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्या केव्हा सुरू होणार? जाणून घ्या…)

मेट्रो स्थानके पूरमुक्त होणार

पावसाळ्यात बऱ्याचवेळा मुंबईत पूरस्थिती उद्भवते, एन्ट्री आणि एक्झिट पॉंईंटकडून पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यानुसार पाण्याची अडवणूक करण्यासाठी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीसारखी परिस्थिती उद्भवली तर फ्लडगेट्स हे पाणी अडवण्यासाठी सक्षम आहेत असा दावा मेट्रो ३ कडून करण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.