पुणेकरांनो तुमच्या खिशावर येणार भार! बसणार ‘या’ कराचा भुर्दंड

173

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात मेट्रो प्रकल्पातील काही किलो मीटरचा टप्पा सुरू झाला आहे. मात्र पुणे शहरात मेट्रो पूर्ण क्षमतेने तयार होण्यास अद्याप काही कालावधी आहे. असे असले तरी येत्या १ एप्रिलपासून पुणेकरांना एक टक्का मेट्रो अधिभारचा भुर्दंड बसणार आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंडवडसाठी १ एप्रिलपासून मालमत्ता खरेदी-विक्री करताना एक करताना एक टक्का मेट्रो कर पुणेकरांना द्यावा लागणार आहे. या संदर्भातील स्वतंत्र आदेश गुरूवारी नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने काढले असल्याची माहिती मिळतेय.

त्या शहरात स्टॅम्प ड्युटीवर मेट्रो अधिभार लागू

असे सांगितले जात आहे की, ज्या शहरात मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे, तेथे राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीवर एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अंमलबजावणीस प्रारंभ झाला. परंतु 2020 मध्ये राज्य सरकारने या अधिभार वसुलीस 31 मार्च 2022 पर्यंत स्थगिती दिली होती.

(हेही वाचा – मुंबईत आमदारांना खरंच मोफत घर मिळणार? गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी दिले स्पष्टीकरण)

म्हणून होणार घराच्या किमतीत मोठी वाढ

मेट्रो सेसच्या स्थगितीचा कालावधी संपल्यानंतर 1 एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्यात येणार आहे. या बरोबरच 1 एप्रिलपासून नवीन व वाढीव रेडीरेकनर दरदेखील लागू होणार असल्याने घराच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फटका सर्वसामन्य नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनाही बसणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.