मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहेत. MMRDA ने आता ऑरेंज मेट्रो (Metro) लाइन 12चे काम हाती घेतले आहे. या मेट्रोचे काम 31 डिसेंबर 2027 पर्यं पूर्ण होणे अपेक्षित असून कल्याण आणि तळोजा अशी दोन शहरे जोडण्यात येणार आहेत. एकूण 23,756 किमीचा कॉरिडोर असणार आहे.
MMRDA ने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या मेट्रो (Metro) प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रो लाइन 12ला दोन इंटरचेंज असणार आहेत. एक मुंबई मेट्रो लाइन 5वरील कल्याण APMC आणि दुसरा नवी मुंबई मेट्रो लाइन 1 वरील अमनदूत (तळोजा) येथे कनेक्ट होणार आहे. या मेट्रोमुळं कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई-ठाणे-भिवंडी-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मेट्रो (Metro) मार्ग तयार होईल आणि प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि सुलभ प्रवास करता येणार आहे.
(हेही वाचा मोदी सरकारच्या CAA कायद्यामुळे ५३ वर्षांनंतर १० बांगलादेशी हिंदूंना मिळाले भारतीय नागरिकत्व)
ही असतील स्थानके
कल्याण तळोजा (मेट्रो १२) अंतर्गत कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा, या स्थानकांचा समावेश असणार आहे. (Metro)
Join Our WhatsApp Community