पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ मार्चला पुणे मेट्रोचे उद्घाटन केले होते. यावेळी शहरात प्रदूषण, वाहतूक कोंडी होऊ नये याकरता पंतप्रधानांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन पुणेकरांना केले होते. पुणे मेट्रोला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच या मेट्रो स्थानकांवर पोहोचण्यासाठी पीएमपीकडून सुद्धा विशेष बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. आता पुणे मेट्रोने नागरिकांसाठी महिन्याभराची खास ऑफर काढली आहे. यानुसार पुणेकरांसाठी ट्रॅव्हल कार्ड सेवेची सुरुवात करण्यात आली आहे असे महामेट्रोने ट्वीट करत सांगितले आहे.
पुणे मेट्रो ट्रॅव्हल कार्ड
- पुणे मेट्रो ट्रॅव्हल कार्ड हे पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळ स्टॉप, आणि गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत तिकीट खिडकीवर खरेदी करता येणार आहे.
- हे कार्ड खरेदी करण्यासाठी (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, मतदान कार्ड, शाळेचे ओळखपत्र) यापैकी कोणत्याही एका ओळख पुराव्यांसह फोटो सादर करावा लागणार आहेत. या कार्डची किंमत ५०० रुपये असून ३० एप्रिलपर्यंत या कार्डचा अमर्यादित प्रवास करण्यासाठी पुणेकरांना वापर करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community* "पुणे मेट्रो ट्रॅव्हल कार्ड सेवेची सुरूवात" *
प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे मेट्रो ट्रॅव्हल कार्ड सेवेची सुरूवात.
पहिल्या 1000 NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनुरूप AFC (ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन) ट्रॅव्हल कार्ड वर विषेश सूट.
कृपया नियम आणि अटी वाचा.#AaliApliMetro pic.twitter.com/bQeu06ZHaJ— Pune Metro Rail (@metrorailpune) March 30, 2022