Metrology Department: राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, दैनंदिन व्यवहारावर परिणाम; काय झाले नुकसान?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांमध्ये विजेच्या कडकडासह तुफान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

230
Metrology Department: राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, दैनंदिन व्यवहारावर परिणाम; काय झाले नुकसान?

मान्सून काही दिवसांपूर्वीच अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला. केरळमध्ये ३१ मे रोजी, तर महाराष्ट्रात काही दिवसांतच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, मात्र त्याआधीच मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. (Metrology Department)

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पडणाऱ्या अनेक ठिकाणी शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडल्यामुळे या परिसरातील अनेक गावांमध्ये नुकसान झाले आहे. त्याशिवाय शेतीचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे उडाली असून काही ठिकाणी झाडे पडल्याची घटनादेखील समोर आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर त्याचा परिणाम झाला आहे. (Metrology Department)

(हेही वाचा – बंगळूरूत IAF च्या पहिल्या आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणालीचे उद्घाटन)

कोकणात शेती आणि आंबा पिकाचे मोठे नुकसान
कोकण परिसरातही मुसळधार पाऊस पडला. मान्सून पूर्व पावसाने कोकण किनारपट्टी परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे बागायती शेतीलादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून अरबी समुद्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मान्सून पूर्व पावसाने कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी या परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचे तसेच आंबा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांमध्ये विजेच्या कडकडासह तुफान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे, मात्र पुढील काही तासांत या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.