HSC Exam : इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत गोंधळ; प्रश्नाच्या ठिकाणी छापले उत्तर

104

मंगळवार, २१ फेब्रुवारीपासून राज्यात इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. या प्रश्नपत्रिकेत मोठी चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नऐवजी चक्क उत्तर छापून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रश्नऐवजी उत्तर छापून आलेले बघून विद्यार्थीही चकीत झाले.

इयत्ता 12वी आजच्या इंग्रजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापले गेले. विद्यार्थ्यांच्या आणि बोर्डाच्या ही बाब लगेच लक्षात आली. बोर्डाने प्रथमदर्शनी चूक मान्य केली आहे. पण नियामकाचा अहवाल आल्यानंतर ज्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाच ग्रेस मार्क देण्याचा निर्णय होईल, अशी माहिती देण्यास आली आहे. तसेच बोर्डाकडून याबाबत खुलासा करण्यात आला असून त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असे स्पष्टीकरण बोर्डाने जाहीर केले. मात्र बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चूक होण्याचे हे काही पहिले उदाहरण नाही, या आधीही अनेक वर्षी बोर्डाच्या प्रशपत्रिकांमध्ये त्रुटी आढळल्या आहे.

(हेही वाचा #Exclusive उद्धव गटाच्या आमदारांना तूर्त जीवदान; शिवसेना ‘व्हीप’ बजावणार नाही!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.