म्हाडा प्राधिकरणातील विविध विभागीय मंडळातील ११,१८४ सदनिकांना लॉटरी सोडतीत प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची मागील दहा वर्षांपासून विक्री होऊ शकलेली नाही. या विक्री अभावी रिक्त सदनिकांच्या देखभाल, कर, पाणी व विद्युत बिले, उद्द्वाहन देखभाल आदींसाठी प्राधिकरणाचे कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याने म्हाडाने आता या सदनिकांच्या विक्रीसाठी नवीन धोरण ठरविले आहे. ज्यामध्ये पाच पर्यायांचा समावेश असलेले धोरण निश्चित करण्यात आले असून या निर्णयामुळे गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रिअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला असून या माध्यमातून म्हाडाचा अनेक वर्षांपासून अडकलेला निधी मोकळा होण्यास मदत होणार आहे. (MHADA)
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) विभागीय मंडळांमधील विक्रीअभावी रिक्त सदनिका विक्रीसाठी प्राधिकरणाचे धोरण ठरविण्याकरिता ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनाखाली अभ्यास समिती गठित करण्यात आली. या समितीने अभ्यासाअंती सुचविलेल्या शिफारशींनुसार धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार म्हाडाच्या विभागीय मंडळांनी रिक्त सदनिका विक्रीकरिता तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. (MHADA)
(हेही वाचा – AUSTRAHIND-23 : भारतीय सशस्त्र दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला रवाना; संयुक्त लष्करी सराव करणार)
या निर्णयामुळे गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रीअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला असून या माध्यमातून म्हाडाचा अनेक वर्षांपासून अडकलेला निधी मोकळा होण्यास मदत होणार आहे. याद्वारे उपलब्ध होणार्या निधीमुळे म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांना अधिक गती मिळणार आहे. समितीने रिक्त सदनिका विक्रीसाठी सादर अहवालातील शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पाच पर्यायांचा समावेश आहे. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या धोरणात, ‘सदनिकांची थेट विक्री’, ‘सदनिका भाडे खरेदी हप्त्यानुसार विक्री’, ‘सदनिका भाड्याने देणे’, ‘लिलाव पद्धतीने रिक्त सदनिका विक्री करणे’ आणि विपणन संस्था/रिअल इस्टेट संस्था नेमणेबाबत या पाच पर्यायांचा समावेश आहे. (MHADA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community