MHADA गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विकासकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त

‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांचे निर्देश

107
MHADA गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विकासकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त
MHADA गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विकासकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त
  • मुंबई, विशेष प्रतिनिधी

म्हाडा विभागीय मंडळ स्तरावरील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी विभागीय मंडळांनी गुंतवणूकदारांची बैठक बोलावून ‘म्हाडा’च्या (MHAD) गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विकासकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करावे, असेननिर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी दिले.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या सूचनेनुसार १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. म्हाडाच्या मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व विभागीय मंडळांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा जयस्वाल यांनी आज म्हाडा मुख्यालयात घेतला.

(हेही वाचा – मुंबईतील Hit And Run च्या घटना वाढल्या; २०२३ मध्ये रस्ते अपघातात ३५१ जणांचा मृत्यू )

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सर्व विभागीय मंडळांनी १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यातील “नागरिकांच्या तक्रारींचे निवारण” या महत्त्वपूर्ण घटकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिन्यातून किमान दोन वेळा जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी दिले. या जनता दिनात नागरिकांना प्रत्यक्ष सहभाग घेता यावा, यासाठी महसुली विभागातील संबंधित जिल्ह्यांमध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे अर्जदारास उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Metro 3 ची ट्रेन ‘कफ परेड’ स्थानकात दाखल; ‘ॲक्वा लाईन’ अंतिम टप्प्याच्या प्रवासासाठी सज्ज!)

जयस्वाल (Sanjeev Jaiswal) म्हणाले की, शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यामध्ये समाविष्ट प्रकल्पांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता तात्काळ घेऊन एका आठवड्यात निविदा प्रसिद्ध कराव्यात. कृती आराखड्यातील प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया राबवताना नव्याने जारी निर्णयानुसार निविदेचा कालावधी कमी ठेवावा. म्हाडाच्या (MHAD) विभागीय मंडळांनी कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी व त्याचा कार्यवाही अहवाल छायाचित्रांसह पाठवण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले. कार्यालयामध्ये दिशादर्शक फलक, अभ्यंगतांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, दिव्यांगांसाठी रॅम्प, कार्यालय परिसराचे सौंदर्यीकरण करावी, विभागीय मंडळाच्या प्रत्येक कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन करावेत व त्या कक्षामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी दिले.

विभागीय मंडळांच्या मुख्य अधिकारी यांनी दर मंगळवारी क्षेत्रीय प्रकल्पांना भेटी द्याव्यात व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले. कृती आराखड्यानुसार म्हाडाच्या (MHAD) सर्व विभागीय मंडळांनी म्हाडाच्या (MHAD) माहिती व संचार तंत्रज्ञान विभागाशी समन्वय ठेवावा व संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी दिले. यावेळी म्हाडाचे मुख्य अभियंता महेशकुमार जेसवानी, शिवकुमार आडे, वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, म्हाडाच्या सचिव नीलिमा धायगुडे, मुख्य वास्तुविशारद व रचनाकार प्रवीण साळुंखे आदी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.