Grant Road Building Collapsed : ग्रॅंट रोडच्या ‘त्या’ इमारतीला जूनमध्ये म्हाडाने बजावली होती नोटीस

175
Grant Road Building Collapsed : ग्रॅंट रोडच्या 'त्या' इमारतीला जूनमध्ये म्हाडाने बजावली होती नोटीस

ग्रँट रोड रेल्वे स्थानकासमोरील म्हाडाची उपकर प्राप्त सैदुन्निस्सा इमारतीच्या गॅलरी आणि स्लॅबचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून यामध्ये चार जण जखमी झाले आहे. विशेष म्हणजे ही इमारत अतिधोकादायक असल्याने जून महिन्यात नोटीस पाठवून रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे. (Grant Road Building Collapsed)

ग्रॅटरोड रेल्वे स्थानकासमोरील सैदुनिस्सा ही तळ अधिक चार मजली इमारत असून यामध्ये २९ निवासी कुटुंबे आणि २० कमर्शियल वापराचे गाळे होते. या इमारतीच्या गॅलरी व स्लॅबचा भाग शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून या इमातरीतील ७ ते ८ रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यामध्ये ८० वर्षी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. विरा वाडिया असे या महिलेचे नाव आहे. तर भाटीया रुग्णालयात दाखल केलेल्या अतुल शहा (५५) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. तर निकेत शहा (२६) विजयकुमार निषाद (२५) यांच्यावर उपचार करून घरी सोडून देण्यात आले. तर सिध्देश पालीजा (३०) यांच्यावर ब्रिच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या इमारतीच्या खाली अनेक दुचाकी उभ्या होत्या. त्यामुळे बाल्कनी आणि स्लॅबचा भाग या वाहनांवर पडल्याने काही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. (Grant Road Building Collapsed)

(हेही वाचा – Bihar : प्रशांत किशोर बिहारच्या २४३ जागांवर निवडणूक लढणार; ‘या’ तारखेला होणार जन सूरज पार्टीची स्थापना)

म्हाडाची उपकर प्राप्त असून या इमारतीचे आर्युमान ८० ते १०० वर्षांचे आहे. ही इमारत अ श्रेणीत येत असून यावर करण्यात आलेल्या दुरुस्तीची मर्यादा संपुष्टात आल्याने उर्वरीत कामांसाठी रहिवाशांना सुमारे एक कोटी रुपयांचा निधी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या इमारतीची दुरुस्ती न झाल्याने ७ जून २०२४ रोजी भाडेकरू तथा रहिवशांना इमारत रिकामी करण्यासाठी सूचना जारी करण्यात आली होती, असे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर मागील वर्षी मे आणि त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्येही म्हाडाने या इमारतीच्या रहिवाशांना नोटीस जारी करून दुरुस्ती करण्याबाबत अवगत केले होते. (Grant Road Building Collapsed)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.