MHADA Hoardings : म्हाडाच्या जमिनीवरील जाहिरात फलकांना नोटीस, विलेपार्ल्यातील अनधिकृत फलकांवर कारवाई

1347
MHADA Hoardings : म्हाडाच्या जमिनीवरील जाहिरात फलकांना नोटीस, विलेपार्ल्यातील अनधिकृत फलकांवर कारवाई

घाटकोपरमधील महाकाय जाहिरात फलकाच्या दुर्घटनेनंतर अनधिकृत फलकांवरील कारवाई विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु असून शुक्रवारी म्हाडा मुंबई मंडळ मालकीच्या जमिनीवरील जुहू विलेपार्ले येथील शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील अनधिकृत जाहिरात फलक म्हाडाच्यावतीने हटवण्यात आला आहे. दरम्यान, म्हाडा जमिनीवर तथा भूखंडावर उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांबाबत जाहिरातदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून जाहिरात कंपन्यांनी म्हाडा मुंबई मंडळाची एनओसी निश्चित कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेला सादर न केल्यास जाहिरात फलकांना देण्यात आलेला परवाना रद्द करण्याचा निर्णय म्हाडा मुंबई मंडळाने घेतला आहे. (MHADA Hoardings)

घाटकोपरमधील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला असताना अनधिकृत होर्डिंग दिसल्यास ते काढून टाका, अशाप्रकारचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारीसंजीव जयस्वाल यांनी ‘म्हाडा’च्या भूखंडावर असलेल्या जाहिरात फलकांचा आढावा घेत जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचे व अनधिकृत जाहिरात फलक तात्काळ हटवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. (MHADA Hoardings)

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर व म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांच्या निर्देशानंतर म्हाडा मुंबई मंडळातर्फे शुक्रवारी अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याची कारवाई म्हाडा व महापालिका यांच्यातर्फे करण्यात आली. म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांच्या निर्देशानुसार म्हाडा मुंबई मंडळाच्या भूखंडांवरील जाहिरात फलकांची माहिती संकलित करण्यात आली. या सर्वेक्षणात म्हाडा मुंबई मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र न घेता महापालिकेच्या परवानगीने म्हाडाच्या भूखंडांवर ६० अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. मंडळातर्फे या अनधिकृत जाहिरात फलक तात्काळ हटवण्याची कार्यवाही करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला पत्र पाठवण्यात आले आहे. (MHADA Hoardings)

(हेही वाचा – G7 Summit मध्ये नरेंद्र मोदींनी घेतली जागतिक नेत्यांची भेट, ऋषी सुनक-मॅक्रॉन यांच्या द्विपक्षीय बैठकीत झाली ‘ही’ चर्चा)

जाहिरातदारांना कारणे दाखवा नोटीस

जुहू विलेपार्ले येथील शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील ४० बाय ४० फूट आकारमानाचा जमिनीवर उभारण्यात आलेला हा अनधिकृत जाहिरात फलक उभारण्यासाठी ‘म्हाडा’चे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नव्हते. दरम्यान, म्हाडाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या जाहिरात कंपन्यांना म्हाडा मुंबई मंडळातर्फे नोटिस बजावण्यात आली. या अनधिकृत जाहिरात फलक स्वतःहून काढून घेण्याची सूचना केली आहे. जाहिरात कंपन्यांनी तसे न केल्यास म्हाडातर्फे महानगरपालिकेच्या मदतीने जाहिरात फलक हटवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले. (MHADA Hoardings)

महानगरपालिकेतर्फे मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील जमिनीवर तथा भूखंडावर उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांबाबत जाहिरातदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. जाहिरातदारांनी तथा जाहिरात कंपन्यांनी म्हाडा मुंबई मंडळाकडून प्राप्त ना-हरकत प्रमाणपत्र निश्चित कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (विशेष) यांच्या कार्यालयात सादर न केल्यास या जाहिरात फलकांना देण्यात आलेला परवाना रद्द केला जाणार आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका अधिनियम १८८८ अन्वये योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे म्हाडा मुंबई मंडळाने स्पष्ट केले आहे. (MHADA Hoardings)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.