Mhada Home Mumbai: मुंबईकरांनो स्वत:च्या हक्काचं घर घेण्याची इच्छा पूर्ण होणार, म्हाडाने उभारली ३६०० घरे, जाणून घ्या नेमके ठिकाण कुठले? 

मुंबई घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. म्हाडा लवकरच मुंबईत ३६०० घरं उभारणार आहे. वेगवेगळ्या उत्पन्न असलेल्या गटातील लोकांसाठी ही घरं असणार आहेत.

503
Mhada Home Mumbai: मुंबईकरांनो स्वत:च्या हक्काचं घर घेण्याची इच्छा पूर्ण होणार, म्हाडाने उभारली ३६०० घरे, जाणून घ्या नेमके ठिकाण कुठले? 

मायानगरी मुंबईत स्वत:च्या हक्काची घरे घेण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र वाढत्या महागाईमुळे अनेकांची स्वप्न धुळीस मिळतात. यामुळे बरेच नागरिकांची स्वप्न हे अर्धवटच राहतात. मात्र अशावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडा (MHADA) ने सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किंमतीत घर उपलब्ध करुन देते. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. म्हाडा मुंबईत ३६०० घरं उभारणार (MHADA will build 3600 houses in Mumbai) असून विविध उत्पन्नाच्या गटातील लोकांसाठी ही घरं उपलब्ध होणार आहेत. (Mhada Home Mumbai)

(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi यांनी केला सरकार स्थापनेचा दावा; 9 जूनला होणार शपथविधी)

मुंबईत ही घरे नेमकी कुठे असणार? 

२०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबईकरांसाठी ३६०० घरे उपलब्ध करून देण्याचे म्हाडाचे नियोजन आहेत. यामध्ये मुंबईतील पवई, मागाठाणे, कन्नमवार नगर, पहाडी गोरेगाव, अॅन्टॉप हिल अशा ठिकाणी ही घरं असणार आहेत. मागील वर्षी म्हाडाने ऑगस्ट महिन्यात ४०८२ घरांसाठी मुंबईत लॉटरी काढली होती. ४०८२ घरं उपलब्ध असताना या घरांसाठी तब्बल १ लाख २२ हजार अर्ज आले होते. आता ३६०० घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती आहे. (Mhada Home Mumbai)

(हेही वाचा – Sanjay Raut : ‘महाविकास आघाडीत मोठा भाऊ कुणी नाही, उबाठाच महत्त्वाचा पक्ष’)

वर्षभरात १३ हजार नव्या घरांच्या निर्मितीचं उदिष्ट्यं

२०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबई आणि मुंबई उपनगरसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांतदेखील म्हाडा घरं उभारणार आहे. या अंतर्गत जवळपास १२ ते १३ हजार घरांची निर्मिती होणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.