गृहस्वप्न साकार होणार! म्हाडाकडून नववर्षाची भेट, सोडत प्रक्रियेत महत्त्वाचा बदल…

155

म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या घरांसाठी आता एकदाच नोंदणी करावी लागणार असून ही नोंदणी कायमस्वरुपी असणार आहे. या नोंदणीच्या आधारे नागरिकांना भविष्यात कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. ही नोंदणी करताना इच्छुकांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नोंदणीला सुरूवात होणार आहे. म्हाडा सोडत प्रक्रियेतून मानवी हस्तक्षेप टाळून ही प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शकपणे राबवण्यासाठी म्हाडाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : पीएमपी कर्मचाऱ्यांना नववर्षाचे गिफ्ट! सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार)

नव्या नियमांमुळे काय बदल होणार?

  • नव्या बदलांनुसार आता प्रत्येक सोडतीसाठी नोंदणी करण्याची गरज नाही.
  • एकदा करण्यात आलेली नोंदणी ही कायमस्वरुपाची असणार आहे.
  • या नोंदणीच्या आधारे वर्षानुवर्षे सोडतीसाठी अर्ज करता येणार आहेत.
  • नोंदणी केल्यानंतर मुंबई मंडळ, कोकण मंडळ अथवा इतर कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी नागरिकांना अर्ज करणे शक्य होणार आहे.
  • नोंदणीधारकाला दर पाच वर्षांनी निवासाचा दाखला सादर करावा लागणार आहे.
  • प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला, आयकर विवरण पत्र सादर करावे लागणार आहे.
  • या नव्या नोंदणीस जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरूवात होणार आहे.
  • सोडतीच्या APP वरून ही नोंदणी करण्यात येणार असून यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, निवासाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे ऑनलाईन माध्यमातून सादर करावी लागणार आहेत.

केवळ चावी घेण्यासाठी कार्यालयात…

नव्या बदलांनुसार अर्जदाराजी आधीच पात्रता निश्चित झाल्यामुळे विजेत्यांना तात्काळ देकार पत्र देण्यात येणार आहे. हे देकार पत्र मिळाल्यानंतर विजेता नागरिक संपूर्ण रक्कम भरेल आणि त्यानंतर एका दिवसात त्याला घराची चावी देण्यात येईल. सोडतीनंतर कोणत्याही कामासाठी विजेत्यांना स्वत: उपस्थित रहावे लागणार नाही. केवळ चावी घेण्यासाठी, करार करण्यासाठी एकदाच म्हाडाच्या कार्यालयात यावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.