
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
नागरिक आणि म्हाडा प्रशासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी ५ अर्जदारांच्या तक्रारींवर सुनावणी दिली तसेच त्यांनी म्हाडा गृहनिर्माण भवनातील विविध कार्यालयांना भेट देऊन नागरिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित जनता दरबार आज वेगळ्या पद्धतीने घेण्यात आला. जनता दरबार अंतर्गत प्राप्त ५ अर्जदारांच्या तक्रारींवर जयस्वाल यांनी सुनावणी दिली व त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निर्देशही दिले. (MHADA Janata Durbar)
(हेही वाचा – BMC : छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात झाडांभोवती कठडे; बांधकामाऐवजी हिरवळ राखण्याची रहिवाशांची सूचना)
सभागृह आणि सुनावणी असे नेहमीचे चित्र मोडीत काढत जयस्वाल यांनी म्हाडा गृहनिर्माण भवनातील विविध कार्यालयांना भेट दिली. ज्या कार्यालयांमध्ये अधिकाधिक नागरिक उपस्थित होते. त्या कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांना म्हाडा अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत असल्याबाबत चौकशी देखील केली. अशाप्रकारे १२ प्रकरणांमध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचे निवारण केले. अनेक प्रसंगी अधिकाऱ्यांच्या नागरिकांशी सौहार्दपूर्ण व्यवहाराचे कौतुकही केले. (MHADA Janata Durbar)
(हेही वाचा – वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे गरिबांच्या जमिनींचे संरक्षण; मंत्री Mangal Prabhat Lodha म्हणाले…)
नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यातील “नागरिकांच्या तक्रारींचे निवारण” या महत्त्वपूर्ण घटकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म्हाडामध्ये जनता दिन आयोजित करण्यात येत आहे. तसेच जयस्वाल यांनी म्हाडाच्या विभागीय मंडळांतर्फे देखील नियमितपणे जनता दरबारचे आयोजन करण्याचे नुकतेच निर्देश दिले आहेत, त्यानुसार छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक येथील गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला व त्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. (MHADA Janata Durbar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community