मुंबईत आपलंही हक्काचं घर असावं असं प्रत्येक सर्वसामान्याचं स्वप्न असतं. मुंबई घरांच्या वाढलेल्या किंमती पाहाता ही घरं सर्वसामान्यांच्या अवाक्यात नसतात. अशावेळी म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण सर्वसामान्यांसाठी कमी किंमतीत घरं उपलब्ध करुन देतात. ज्या लोकांनी म्हाडाच्या नुकताच निघालेल्या लॉटरीत अर्ज केला नसेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता संधी सोडू नका, कारण म्हाडाच्या कोकण मंडळाकडून (Mhada Konkan Lottery 2023) घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचं जाहीर केलं आहे.
म्हाडा कोकण मंडळाकडून 4 हजार 17 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात ही सोडत काढण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या सोडतीसाठी अर्जविक्री आणि स्वीकृतीस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात होणार आहे. या सोडतीमध्ये कोकण मंडळातील विरार-बोळींज, डोंबिवली, बाळकूम, खोणी, शिरढोण, गोठेघर इथल्या घरांचा यात समावेश आहे. डोंबिवलीमधील (Dombivli) जवळपास 600 घरे आणि मागील सोडतीमधील शिल्लक राहिलेल्या घरांसाठी ही सोडत असणार आहे.
(हेही वाचा Government Report : घरापासून दूर असल्यावर 56% मुली ठेवतात शारीरिक संबंध; सरकारच्या धक्कादायक अहवाल)
दरम्यान या घरांच्या सोडतीसाठी येत्या आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होईल असं सांगण्यात येतंय. तर या घरांच्या किंमती 20 ते 40 लाख दरम्यान असण्याची शक्यता आहे. गेल्या सोडतीतील 4,654 घरांपैकी फक्त 2131 एवढी घरं विकली गेली होती. याचा आर्थिक फटका मंडळाला बसला होता. म्हणून आता ही घरं विकण्यासाठी आता पुन्हा सोडत काढण्याचा महत्वाचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या सोडतीमध्ये योजनानिहाय घरांची संख्या पुढील प्रमाणे आहे. पंतप्रधान आवास योजनातर्गंत 656 घरं असणार आहेत. तर 20 टक्के योजनेत 1082, कोकण मंडळ प्रथम प्राधान्य 2211 आणि पत्रकार (डिजिटल) साठी 67 घरं असणार आहेत.
Join Our WhatsApp Community