यंदा म्हाडाच्या कोकण मंडळ सोडतीमध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत २ हजार ४८ घरांसाठी शुक्रवारपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. शुक्रवार १६ मार्चपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : आता पहाटे पाच वाजताच उघडणार उद्यान, मैदानांची दारे…)
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री
विरार-बोळींजमधील २ हजार ४८ घरांची विक्री काही कारणास्तव होऊ शकलेली नाही त्यामुळे या घरांचा समावेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत करण्यात आला आहे. कोकण मंडळातील विरार-बोळींजमधील २ हजार ४८ घरांसाठी तब्बल ३ वेळा सोडत काढण्यात आली परंतु तरीही या घरांची विक्री न झाल्याने म्हाडाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनामत रक्कम सर्वप्रथम सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहे.
या योजनेसाठीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीसाठी कमी कालावधी देण्यात आला आहे. शुक्रवार १७ मार्च दुपारी १२ वाजल्यापासून अर्ज विक्री – स्वीकृतीस सुरूवात होणार आहे. या योजनेतील घरासाठी १२ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.
- प्रारूप यादी – २७ एप्रिल सायंकाळी ६ वाजेपर्यंत
- अंतिम यादी – ४ मे सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध करण्यात येईल.
- १० मे रोजी यशस्वी अर्जदारांची यादी जाहीर करण्यात येईल.