MHADA : म्हाडा कोंकण मंडळ लॉटरी : ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात

कोंकण मंडळाच्या या लॉटरी सोडतीमध्ये १०१० सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेतील असून यासाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला शुक्रवार १५ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे.

178
MHADA : म्हाडा कोंकण मंडळ लॉटरी : ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात
MHADA : म्हाडा कोंकण मंडळ लॉटरी : ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात

म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेच्या “गो लाईव्ह” कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. कोंकण मंडळाच्या या लॉटरी सोडतीमध्ये १०१० सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेतील असून यासाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला शुक्रवार १५ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे.

वांद्रे पूर्व येथील एका सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाअंतर्गत बोलतांना संजीव जयस्वाल यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना शुभेच्छा दिल्या व ते पुढे म्हणाले की राज्य शासनाच्या समजातील शेवटच्या घटकाला परवडणार्‍या दरातील घरे मिळवीत या उद्दिष्टपूर्ती प्रती म्हाडा कटिबद्ध आहे. येत्या वर्षभरात राज्यात जास्तीत जास्त गृह बांधणीचे प्रकल्प उभारणीचे नियोजन सुरू असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे, म्हाडाचे मुख्य अभियंता-१ धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-२ सुनील जाधव, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, कोंकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी रवींद्र पाटील, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, उपमुख्य अभियंता महेशकुमार जेसवानी आदी उपस्थित होते.

०७ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी ११. ०० वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. IHLMS 2.0 या नूतन संगणकीय प्रणाली व ॲपच्या सहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरुवात झाली. विक्री सोडतीची ही लिंक १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. १८ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच १८ ऑक्टोबर, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

IHLMS 2.0 या नूतन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सोडत प्रक्रियेत सहभाग घेणे नागरिकांच्या दृष्टीने सुलभ व सोपे झाले आहे. कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios)या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम वर उपलब्ध आहे. ॲन्ड्रॉइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी केले आहे.

(हेही वाचा – Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली)

या योजनेतील सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेण्याकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी व अर्ज भरावा. सोडतीतील इतर योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी https://mhada.gov.inhttps://housing.mhada.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. अनामत रक्कम भरणा व परतावा संबंधित सुविधेकरिता इंडियन बँकेच्या ७०६६०४७२१४ व ९५२९४८५७८० या कॉल सेंटर हेल्पलाईन वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.