म्हाडाच्या घरांची रक्कम तीन टप्प्यात भरता येणार

136

म्हाडाच्या घरांसाठी रक्कम भरणे सुलभ व्हावे यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ग्राहकांना ही खास सुविधा दिली आहे. म्हाडाने तीन टप्प्यात घराची रक्कम भरण्याची सुविधा दिली आहे.

मौजे बाळकुम-ठाणे गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांना फायदा

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 2018 आणि त्यापूर्वी काढलेल्या सदनिका सोडतींमधील मौजे बाळकुम-ठाणे या गृहनिर्माण योजनेतील 197 लाभार्थ्यांना सदनिकेची एकूण किंमत तीन टप्प्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. कोकण मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या  या सुविधे अंतर्गत या योजनेतील लाभार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात सदनिकेच्या एकूण किंमतीच्या 25 टक्के रक्कम 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत भरायची आहे. त्यानंतर  दुसऱ्या टप्प्यातील 50 टक्के रक्कम 31 जानेवारी 2023 पर्यंत भरायची आहे. तसेच तिसऱ्या टप्प्याअंतर्गत उर्वरित 25 टक्के रक्कम भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांत वितरणपत्रामधील अटी शर्तींच्या अधिन राहून भरणे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. सोडतीच्या नियमानुसार देकार पत्र मिळाल्यापासून 45 दिवसांत सदनिकेच्या एकूण किंमतीच्या दहा टक्के रक्कम आणि त्यानंतर 60 दिवसांत 90 टक्के रक्कम भरून घेतली जाते. मात्र, मौजे बाळकूम-ठाणे गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांसाठी हे नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

(हेही वाचा पीएफआयवरील बंदीनंतर हिंदुत्ववादी नेत्यांना धमकीचे फोन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.