कोकण मंडळाच्या ४७५२ घरांसाठी सोडत! या तारखेपासून सुरू होणार अर्ज

172

म्हाडा कोकण मंडळाच्या ४ हजार ७५२ घरांसाठी १० मे रोजी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी अर्जप्रक्रियेला ८ मार्चपासून सुरूवात होणार आहे असे म्हाडाने जाहीर केले आहे. या सोडतीमध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेचा वापर करण्यात येणार आहे. विरार-बोळींजमधील २ हजार ४० घरांसाठी ही योजना वापरण्यात येणार आहे. हे घर अल्प आणि मध्यम गटातील असून त्यांची किंमत २३ ते ४१ लाखांपर्यंत आहे.

( हेही वाचा : नौदल कमांडर्स परिषदेचे INS विक्रांतवर आयोजन! ६ मार्चला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संबोधित करणार)

महत्त्वाच्या तारखा

  • कोकण मंडळ विभागाची सोडत जाहिरात – ६ मार्च २०२३
  • अर्ज विक्री – बुधवार ८ मार्च २०२३
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख – १२ एप्रिल २०२३
  • सोडत – १० मे २०२३
  • स्थळ – डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
  • वेळ – सकाळी १० वाजता

कोणासाठी किती घरे?

  • अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गट.
  • एकूण ४ हजार ७५२ घरांचा समावेश.
  • पंतप्रधान आवास योजनेत ४ हजार ७५२ पैकी ९८४ घरे.
  • १ हजार ५५४ घरे २० टक्के योजनेत.
  • उर्वरित घरे म्हाडा गृहनिर्माण योजनेत समाविष्ट.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.