मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या ४,०८३ घरांसाठी १८ जुलैला सोडत, ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

228
मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या ४,०८३ घरांसाठी १८ जुलैला सोडत, 'या' तारखेपासून भरता येणार अर्ज
मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या ४,०८३ घरांसाठी १८ जुलैला सोडत, 'या' तारखेपासून भरता येणार अर्ज

मुंबईच्या सारख्या मायानगरीमध्ये स्वतः घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. हीच संधी म्हाडाकडून मिळत असते. नुकताच म्हाडाच्या कोकण विभागाच्या सोडतीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांसाठी सोडत १८ जुलै रोजी होणार आहे. या सोडतीची जाहिरात २२ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच याच दिवसांपासून नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेस सुरुवात होणार असून शेवट २६ जून असणार आहे.

(हेही वाचा – महापालिकेने नव्याने बनवलेल्या पदपथांची ‘जिओ’ लावतेय वाट)

मुंबई महामंडळाच्या सोडतीची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होती. पण अनेक कारणांमुळे ती लांबणीवर जात होती. अखेर मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण झाली असून २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसेच २६ जूनपर्यंत आलेल्या अर्जदारांची सोडत १८ जुलैला वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.

कोणत्या गटात किती घरे?

अत्यल्प गट – २ हजार ७८८ घरे
अल्प गट – १ हजार २२ घरे
मध्यम गट – १२३ घरे
उच्च गट – ३९ घरे
विखुरलेली – १०२ घरे
एकूण घरे – ४ हजार ८३ घरे

कोणत्या गटासाठी कोणत्या ठिकाणी घरे?

अत्यल्प उत्पन्न गट – गोरेगावमधील पहाडी, अँटॉप हिल, विक्रोळीच्या कन्नमवार नगर घरे
अल्प उत्पन्न गट – दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), गायकवाड नगर (मालाड), पत्राचाळ, जुने मागाठाणे (बोरिवली), चारकोप, कन्नमवार नगर, विक्रांत सोसायटी (विक्रोळी), गव्हाणपाडा
मध्यम उत्पन्न गट –  दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर), कांदिवली
उच्च उत्पन्न गट – ताडदेव, लोअर परळ, सायन, शिंपोली, तुंगा पवई

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.