- विशेष प्रतिनिधी, मुंबई
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून येत्या ०६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. (Mhada Lottery 2024)
(हेही वाचा – BMC : बांधकामातून निर्माण होणारी आणि रस्त्यावरील धूळ रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, मार्गदर्शक तत्वे जारी)
कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आला. मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ०६ जानेवारी, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. ०७ जानेवारी, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक ०७ जानेवारी, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी २० जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर दिनांक २२ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ५ .०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. २४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता सोडतीत सहभाग घेणार्या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. (Mhada Lottery 2024)
(हेही वाचा – Stock Market : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार)
३१ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५९४ सदनिका, १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ८२५ सदनिका, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विखुरलेल्या ७२८ सदनिका, रोहा-रायगड व ओरस सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे ११७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (Mhada Lottery 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community