माया नगरीत राहणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य मुंबईकरांचं स्वप्न असतं की, मुंबईत एक तरी का होईना, स्वतःचा फ्लॅट असावा. आता हेच मुंबईकरांचं स्वप्न काही अंशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर म्हाडाचं घर (Mhada Home Mumbai) विकत घेण्याचे स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण म्हाडाच्या मुंबई विभागातील दोन हजार घरांच्या लॉटरीची (Mhada Lottery) जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. या सोडतीत दिंडोशी, गोरेगाव, विक्रोळी आणि अँटॉप हिल येथील घरांचा समावेश करण्यात येणार आहे. (Mhada Lottery 2024)
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच MHDA तर्फे मुंबई विभागाच्या घरांच्या लॉटरीची वाट पाहणाऱ्यांचा प्रतीक्षा कालावधी लवकरच संपणार आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात लॉटरीची जाहिरात (Mhada Lottery Advertisment) प्रसिद्ध होणार आहे.
(हेही वाचा – अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाला सतर्क राहण्याचे CM Eknath Shinde यांचा आदेश)
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून नागरिक लॉटरीसाठी अर्ज करू शकतील. मुंबई मंडळाची शेवटची लॉटरी गेल्या वर्षी काढण्यात आली होती. 2023 मध्ये जाहीर झालेल्या 4,082 घरांच्या लॉटरीसाठी 1,00,935 लोकांनी नोंदणी केली आहे. अर्जदारांच्या संख्येपेक्षा घरांची संख्या कमी असल्याने मागील सोडतीत हजारो अर्जदारांची निराशा झाली होती. निराश अर्जदार 2024 च्या लॉटरीमध्ये त्यांचे नशीब पुन्हा आजमावू शकतात. लॉटरी अर्जदाराची प्रक्रिया या महिन्यात सुरू होईल, तर लॉटरीचा निकाल सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल. (Mhada Lottery 2024)
(हेही वाचा – Hindu मतांसाठी भाजपा मुंबईतील ३६ मतदारसंघांत करणार चाचपणी)
ही कागदपत्रे तयार ठेवा
मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या कारणास्तव, लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांकडे 7 कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. या कारणास्तव, लॉटरीची तारीख जाहीर होण्यापूर्वी, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तयार ठेवणे गरजेचे आहे. (Mhada Lottery 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community