MHADA Lottery Mumbai: नागरिक झाले हैराण; म्हाडाच्या अॅपमध्ये बिघाड! 

155
MHADA Lottery Mumbai: नागरिक झाले हैराण; म्हाडाच्या अॅपमध्ये बिघाड! 
MHADA Lottery Mumbai: नागरिक झाले हैराण; म्हाडाच्या अॅपमध्ये बिघाड! 

मायानगरी मुंबईत हक्काचं घर असावं असं सर्वचं नागरिकाचं स्वप्न असतं, मात्र म्हाडा मुंबई मंडळाच्या (MHADA Mumbai Board) २०३० घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृती सुरू होऊन दोन दिवस उलटले नाहीत तोच म्हाडाच्या सोडतीचे अॅप मंदावला (Mhada App) आहे. या अॅपमध्ये नोंदणी करताना, ऑनलाइन कागदपत्रे जमा करताना आणि कागदपत्रांच्या पडताळणीत अडथळे येत असून त्यासाठी बराच मोठा कालावधी लागत आहे. त्यामुळे इच्छुक अर्जदार संतप्त झाले आहेत. मुळात अर्ज भरण्यासाठी यंदा केवळ २६ दिवसांचाच कालावधी असून अॅपबाबत अनेक तक्रारी म्हाडा प्राधिकरणासह (MHADA Authority) मुंबई मंडळाकडे येत आहेत. (MHADA Lottery Mumbai)

ताडदेव, वरळी, वडाळा, दादर, पवई, विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली आदी ठिकाणच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी तीन दिवसांत अनामत रकमेसह १००० अर्ज सादर झाले. ही संख्या कमी मानली जात आहे. मुळात यंदा अत्यल्प व अल्प गटातील घरे प्रचंड महाग असल्याने इच्छुकांकडून सोडतीकडे पाठ फिरवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

त्यात आत जे इच्छुक अर्ज भरण्यासाठी पुढे येत आहेत त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोडतीचे अॅप अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नोंदणी व अर्ज भरून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. (MHADA Lottery Mumbai)

अर्जविक्री-स्वीकृतीसाठी प्रत्येक मंडळाकडून किमान ४५ दिवसांचा कालावधी दिला जातो. असे असताना यावेळी मुंबई मंडळाने केवळ २६ दिवसांचाच कालावधी दिला आहे. इतक्या कमी कालावधीत कागदपत्रे कशी जमा करायची, अनामत रक्कम कशी जुळवायची असा प्रश्न अनेकांसमोर असताना त्यात आता अॅपमधील तांत्रिक अडचणींना इच्छुकांना सामोरे जावे लागत आहे.

(हेही वाचा – Independence Day Sale : विस्ताराने १,५७८ रुपयात प्रवास करण्याची संधी)

पडताळणी विलंबाने

उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्डची पडताळणी विलंबाने होत असल्याने नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी वेळ लागत असल्याचे चित्र आहे. याविषयी मुंबई मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे मान्य केले आहे. मात्र कागदपत्रांची काटेकोर पडताळणी व्हावी यासाठी अॅपमध्ये काही बदल केले आहेत. त्यापूर्वी उत्पन्नाच्या माहितीसह इतर माहिती चुकीची देत म्हाडाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यासाठी आम्ही काही बदल केले असून, या बदलानुसार कागदपत्र पडताळणी होत आहे. अशावेळी नावात किंवा इतर माहितीत काही तफावत असल्यास पडताळणीसाठी विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (MHADA Lottery Mumbai)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.