पुणे म्हाडाच्या वतीने लवकरच पुन्हा एकदा तब्बल १२०० घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. ही सर्व घरे २० टक्क्यांतील म्हणजे खासगी व नामांकित बिल्डरांच्या प्रकल्पातील असणार आहेत. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. या संकटात एक नाही, दोन नाही तर चारपेक्षा अधिक आणि १२ हजारांपेक्षा अधिक घरांची सोडत काढून नवीन विक्रम केला आहे.
सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील लोकांना मिळाली घरं
कोरोना संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने नवीन विक्रम केला. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खासगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून २० टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्येदेखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.
(हेही वाचा – हे ‘भोगी’, आमच्या ‘योगीं’कडून शिका! अमृता फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा)
पुणे म्हाडाकडून नवीन विक्रम करण्याची किमया
पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी एक-दोन वर्षातून एखादी सोडत निघत असे; परंतु नितीन माने यांनी पुणे म्हाडाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीपासूनच गरीब व सर्वसामान्य लोकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. यामुळेच कोरोना संकटातदेखील चार-चार सोडत जाहीर करून अनेक नवीन विक्रम करण्याची किमया पुणे म्हाडाने करून दाखविली. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागातील अनेक मोठे बिल्डर म्हाडाला उभेदेखील करीत नव्हते; परंतु माने यांनी समन्वय साधून वेळप्रसंगी कारवाई करून बहुतेक सर्व बिल्डरांकडून हे २० टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले.
(हेही वाचा – औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी, काय असणार अटी-शर्तीं?)