म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. सोडतीत समाविष्ट होणाऱ्या अर्जांची संख्या दहा हजारांचा टप्पाही ओलांडण्याची शक्यता नसल्याने कोकण मंडळावर अर्जविक्री-स्वीकृतीला एका महिन्यांची मुदतवाढ देण्याची नामुष्की आली. या मुदतवाढीनुसार आता इच्छुकांना १८ नोव्हेंबरपर्यंत आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येणार आहे. परिणामी ७ नोव्हेंबरची सोडत रद्द करण्यात आली असून आता १३ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे.(Mhada)
कोकण मंडळाच्या मे महिन्याच्या सोडतीतील शिल्लक आणि इतर उपलब्ध घरांसाठी सप्टेंबरमध्ये सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, १५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू करण्यात आली असून आरटीजीएस, एनईएफटीसह अनामत रक्कम भरत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १८ ऑक्टोबरला ही मुदत संपणार आहे. मात्र, अनामत रकमेसह दाखल झालेल्या अर्जांची संख्या १० हजारांचा पार जाण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव कोकण मंडळाने म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. शुक्रवारी या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.
(हेही वाचा :Congress vs SP : कॉंग्रेसच्या विरोधात सपाने दंड थोपटले; मध्यप्रदेशात दोन्ही पक्ष आमने-सामने)
घरे विकण्यासाठी कसरत
पंतप्रधान आवास योजनेतील आणि विरार-बोळिंज येथील मंडळाच्या घरांची विक्री होत नसल्याने म्हाडा प्राधिकरणाची चिंता वाढली आहे. तर, आर्थिक अडचणीही निर्माण होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मंडळ सोडतीच्या मुदतवाढीच्या कालावधीत घरे विकण्यासाठी विविध योजना आखणार आहे. सोडतीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तर, विविध माध्यमातून सोडतीची प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील एका अधिकाऱ्याने दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community