MHADA Mumbai Board : म्हाडाच्या मुंबईतील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी येत्या २७ जून रोजी ई-लिलाव

1163
MHADA Mumbai Board : म्हाडाच्या मुंबईतील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी येत्या २७ जून रोजी ई-लिलाव

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील १७३ अनिवासी (कमर्शियल) गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जून, २०२४ रोजी संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. (MHADA Mumbai Board)

अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी संगणकीय प्रणालीमध्ये २७ जून रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. २८ जून, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता https://mhada.gov.inwww.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. (MHADA Mumbai Board)

मुंबई मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावामार्फत विक्रीसाठी २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने लागू आदर्श आचारसंहिता यामुळे ई-लिलाव प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. बदललेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाची तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. आता आचारसंहिता संपुष्टात आली असल्याने ई-लिलावाची दिनांक व वेळ मंडळातर्फे निश्चित करण्यात आली आहे. (MHADA Mumbai Board)

(हेही वाचा – Ranjit Savarkar : देवाला अर्पण केलेल्या अशुद्ध प्रसादाचे फळ विपरीतच !)

या ई-लिलावात मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतींनिहाय विक्रीसाठी उपलब्ध अनिवासी गाळ्यांची संख्या पुढीलप्रमाणे :- प्रतीक्षा नगर-शीव येथील १५ दुकाने, न्यू हिंदी मिल-माझगाव ०२, स्वदेशी मिल-कुर्ला-०५, गव्हाणपाडा मुलुंड-०८, तुंगा पवई-०३, कोपरी पवई-०५, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व-०१, शास्त्रीनगर गोरेगाव-०१, सिद्धार्थ नगर गोरेगाव-०१, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व-१७, मालवणी-मालाड-५७, चारकोप भूखंड क्रमांक एक-१५, चारकोप भूखंड क्रमांक दोन-१५ दुकाने, चारकोप भूखंड क्रमांक तीन-०४, जुने मागाठाणे बोरिवली पूर्व -१२, महावीर नगर कांदिवली पश्चिम-१२ दुकाने. (MHADA Mumbai Board)

या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे यांसाठी ०१ मार्च, २०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून ते ०६ जून, २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. (MHADA Mumbai Board)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.