महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात (Water Supply Department) पूर्वी कंत्राटी कामगार म्हणून कामाला असलेल्या एका तरुणाने म्हाडात (MHADA) सदनिका मिळवून देण्याच्या बहाण्याने ६०० लोकांची २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (MHADA)
( हेही वाचा : Trivikrama Temple : कर्नाटकमधील श्री राम त्रिविक्रम स्वामी मंदिराला भेट देणार आहात ?; हे वाचा…)
प्रतीक राजेश धाईंजे (Prateek Rajesh Dhainje) (वय २५, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक याचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. माझी महापालिकेत ओळख आहे. म्हाडात सदनिका मिळवून देतो, असे त्याने नागरिकांना सांगितले. म्हाडाच्या अर्जाच्या नावाखाली प्रत्येकी १५ हजार रुपये घेतले. तसेच म्हाडाचे घर लागल्यानंतर प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे नागरिकांकडून मान्य करून घेतले. (MHADA)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community