-
विशेष प्रतिनिधी, मुंबई:
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ६ हजार २९४ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली असून अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवार १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वा. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. (MHADA Pune Lottery)
(हेही वाचा- जगाने अनमोल रत्न गमावले CM Eknath Shinde यांची ज्येष्ठ उद्योजक Ratan Tata यांना श्रद्धांजली)
अर्ज भरणा प्रक्रिया १२ नोव्हेंबर पर्यंत…
पुणे मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत ५ डिसेंबर, २०२४ रोजी काढण्यात येणार आहे. १० ऑक्टोबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात होणार असून नोंदणीकृत अर्जदार १० ऑक्टोबर, २०२४ रोजी १२.०० वाजेपासूनच ऑनलाइन पेमेंट देखील करू शकणार आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता संपुष्टात येणार आहे. (MHADA Pune Lottery)
सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादी २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार..
त्याचबरोबर १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी रात्री ११.५९ पर्यन्त अर्जदार ऑनलाइन अनामत रक्कमेच भरणा करून शकणार आहेत. तसेच १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. (MHADA Pune Lottery)
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत ..
त्यानंतर २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत. अंतिमतः ३० नोव्हेंबर रोजी सोडतीत सहभाग घेणार्या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये
म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २३४० सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (MHADA Pune Lottery)
सामाजिक गृहनिर्माण योजनेतील १३१ सदनिका…
तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील ४१८ सदनिका प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३३१२ सदनिकांचा समावेश आहे तसेच १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील १३१ सदनिकांचा समावेश आहे. (MHADA Pune Lottery)
(हेही वाचा- Ratan Tata Death : “संकटांवर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात…”, रतन टाटा यांच्या निधनानंतर शरद पवारांकडून श्रद्धांजली)
मंडळातर्फे इच्छुक अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे की, अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे . ही पुस्तिका https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही. (MHADA Pune Lottery)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community