MHADA : म्हाडा पुणे मंडळ: सदनिका सोडत पुढे ढकलली

सोडतीचा नवीन दिनांक संबंधित अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

108
Mhada old buildings : म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची २८ डिसेंबरला संगणकीय सोडत
Mhada old buildings : म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची २८ डिसेंबरला संगणकीय सोडत

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित संगणकीय सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीचा नवीन दिनांक संबंधित अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. (MHADA)

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत

पाच सप्टेंबर, २०२३ रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ६०,००० अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत मिळण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार व नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी मंडळातर्फे सोडतीसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. (MHADA)

(हेही वाचा – Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्ह्यांचा तपास घटला)

प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसा

म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यातील ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (MHADA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.