Mhada कडून मुंबई शहरातील 20 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

1937
MHADA Mumbai Board : म्हाडाच्या मुंबईतील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी येत्या २७ जून रोजी ई-लिलाव

म्हाडाच्या (Mhada) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाच्या वर्षी २० इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २० इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 4 इमारतींचा समावेश आहे.

यंदाचे वर्षी जाहीर केलेल्या 20 अतिधोकादायक इमारतींची यादी पुढीलप्रमाणे :

  • इमारत क्रमांक ४-४ ए,नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)
  • इमारत क्रमांक ५७ निझाम स्ट्रीट
  • इमारत क्रमांक ६७, मस्जिद स्ट्रीट
  • इमारत क्रमांक ५२–५८, बाबु गेणु रोड,
  • इमारत क्रमांक ७ खंडेराव वाडी/ २०४–२०८, काळबादेवी रोड
  • इमारत क्रमांक ५२ -५२ अ, २ री डेक्कन क्रॉस रोड
  • इमारत क्रमांक १२५–१२७ए, जमना निवास, खाडीलकर रोड,गिरगांव
  • इमारत क्रमांक ३१४ बी, ब्रम्हांड को ऑप हौ सोसायटी, व्ही पी.रोड,गिरगाव
  • इमारत क्रमांक ४१८–४२६ एस.व्ही.पी रोड,(१२४ ते १३४ए ) गोलेचा हाऊस,
  • इमारत क्रमांक ८३ – ८७ रावते इमारत, जे.एस.एस.रोड,गिरगांव
  • इमारत क्रमांक २१३–२१५ डॉ.डी.बी.मार्ग,
  • इमारत क्रमांक ३८–४० स्लेटर रोड,
  • ९ डी चुनाम लेन,
  • ४४ इ नौशीर भरुचा मार्ग,
  • १ खेतवाडी १२ वी लेन,
  • ३१सी व ३३ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग , गिरगाव चौपाटी ( मागील वर्षीच्या यादीतील) १७) इमारत क्रमांक १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग ( मागील वर्षीच्या यादीतील)
  • इमारत क्रमांक ५५-५९–६१–६३–६५ सोफीया झुबेर मार्ग,
  • इमारत क्र. ४४-४८, ३३-३७ व ९-१२ कामाठीपुरा ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डींग,
  • अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस – ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, उपकर क्र ग उत्तर ५०-९५ (१) आणि ग उत्तर -५१०३ आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ ( मागील वर्षीच्या यादीतील)

(हेही वाचा Jitendra Awhad यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचा अवमान; सर्व स्तरातून होतोय निषेध; फौजदारी कारवाईची मागणी)

यंदाच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या २० अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये मागील वर्षी जाहीर केलेल्या ४ इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४९४ निवासी व २१७ अनिवासी असे एकूण ७११ रहिवासी / भाडेकरू आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीनुसार ३६ निवासी भाडेकरू / रहिवाशांनी स्वतःची निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत ४६ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरु /रहिवाशी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच ४१२ निवासी भाडेकरू / रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे. मंडळातर्फे संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था कारण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू / रहिवाशाना मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व स्वतःच्या व आपल्या पारिजनांच्या सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.