MHADA च्या ताब्यातील रस्त्यांच्या आरक्षित जागा होणार मुंबई महापालिकेला हस्तांतरित

411
MHADA च्या ताब्यातील रस्त्यांच्या आरक्षित जागा होणार मुंबई महापालिकेला हस्तांतरित
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबईतील वसाहतीतील अर्थात लेआऊटवरील भूभागांवर महानगर पालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित असलेल्या सार्वजनिक रस्त्यांचे हस्तांतरण पालिकेला तात्काळ करण्याचा महत्वाचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी म्हाडा मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये जाहीर केला. (MHADA)

म्हाडाचे मुंबईत एकूण ११४ अभिन्यास तथा वसाहती आहेत. या अभिन्यासातील काही भूभागांवर मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये सार्वजनिक रस्त्यांची आरक्षणे आहेत. विकास आराखड्यातील आरक्षित रस्ते हे सार्वजनिक हितार्थ असल्यामुळे म्हाडाच्या अभिन्यासामधील जे भूभाग सार्वजनिक रस्त्यासाठी विकास आरखडयामध्ये आरक्षित आहेत असे सर्व भूभाग ‘आहे, त्या स्थितीमध्ये’ अतिक्रमण विरहित अथवा अतिक्रमांसाहित एकतर्फी तात्काळ महापालिकेच्या संबधित विभागास हस्तांतरित करावे, असे जयस्वाल यांनी संबंधित कार्यकारी अभियंता व मिळकत व्यवस्थापक यांना गुरुवारी आदेशित केले. (MHADA)

(हेही वाचा – Century Mill Plot : मुंबई महापालिकेला मोठे यश : सेंचुरीचा भूखंड महापालिकेच्या ताब्यात)

या निर्णयामुळे वसाहतींतील रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल. तसेच, शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत अशी रस्त्यांची उभारणी आणि सुधारणा करण्यात पालिकेला मदत होईल. म्हाडाचा हा निर्णय वसाहतींतील रहिवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण त्यामुळे रस्ते विकासाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. (MHADA)

मुंबईत सध्या पुनर्विकास आणि विविध विकास प्रकल्प वेगाने राबवले जात आहेत. मात्र, शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या वसाहतींमधील रस्त्यांचे स्थलांतरण प्रलंबित राहिल्याने अनेक विकास कामे रखडल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. (MHADA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.