- विशेष प्रतिनिधी, मुंबई
म्हाडा (MHADA) कोकण मंडळाच्यावतीने १० ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या ऑनलाईन लॉटरीमध्ये आतापर्यंत सुमारे १२ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. २२६४ सदनिकांच्या विक्रीसाठी काढलेल्या या ऑनलाईन लॉटरीमध्ये ४ हजार ७६ हजार अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे.
(हेही वाचा – BJP च्या दोन केंद्रीय निरिक्षकांची नियुक्ती)
कोंकण मडळाच्यावतीने १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसामावेश योजना व विखुरलेल्या आणि नवीन सदनिका अशाप्रकारे २२६४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १० ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या ऑनलाईन सोडतीतील घरांच्या जाहिरात निवडणूक आचारसंहितेमुळे करता न आल्यामुळे आता व्यापक प्रसिद्धी देऊन सर्वसामान्यांपर्यंत याची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या ऑनलाईन लॉटरीतील घरांचा चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळावा आणि या घरांची विक्री व्हावी यासाठी म्हाडा (MHADA) कोकण मंडळाचा प्रयत्न असुन आता यातील २२६४ घरांसठी ११ हजार ८१४ अर्ज प्राप्त झाला आहे.
(हेही वाचा – RTI कायद्याची देशभरात साडेचार लाख अपिले प्रलंबित; महाराष्ट्रातील स्थिती विदारक)
या नोंदणी झालेल्या अर्जदारांपैंकी ४ हजार ७६ अर्जदारांनी सदनिकांच्या खरेदीसाठी अनामत रक्कम भरली. त्यामुळे भविष्यात या लॉटरीसाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता असल्याचे कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सांगितले. (MHADA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community