Mhada मुंबईसह राज्यभर १९,४९७ घरे बांधणार; किती कोटींची केली तरतूद?

प्राधिकरणाच्या २०२५-२०२६ च्या १५९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी मिळाली.

105
म्हाडाच्या (Mhada) अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या मंडळांमार्फत एकूण १९ हजार ४९७ घरांचे बांधकाम करण्याचे ध्येय ठरवले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ९ हजार २०२ कोटी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाचा (Mhada) २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास सादर करण्यात आला.
प्राधिकरणाच्या २०२५-२०२६ च्या १५९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी मिळाली. मुंबई मंडळाअंतर्गत ५१९९ घरे बांधणार आहेत. कोकण मंडळाअंतर्गत ९९०२ घरे बांधली जाणार आहेत. पुणे मंडळाअंतर्गत १८३६ घरे बांधली जाणार असून नागपूर मंडळाअंतर्गत ६९२ घरे बांधली जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १६०८ घरे बांधली जाणार आहेत, तर नाशिक मंडळात ९१ घरे आणि अमरावती मंडळाअंतर्गत १६९ घरे बांधली जाणार आहेत.
वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी २८०० कोटी, जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी ३५० कोटी, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी २०५ कोटी, गोरेगाव सिद्धधार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी ५७३ कोटी, परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी २० कोटी, गिरणी कामगारांच्या घरासाठी ५७.५० कोटी रुपये, बोरीवली सर्वे क्रमांक १६० वरील योजनेसाठी २०० कोटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी २०० कोटी, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी १७७.७९ कोटी रुपये, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी ५० कोटी, मागाठाणे बोरीवली योजनेसाठी ८५ कोटी अशा प्रकारे इतर अनेक प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. (Mhada)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.