म्हसा बदलापूर या रस्त्याची (Raod) अत्यंत दुरवस्था झाली आहे. म्हसापासून साधारण दोन किमी अंतरावर गेल्या चार वर्षांपासून रस्त्याच्या सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरु आहे. साधारण एक किमी अंतराचे हे काम अर्धवट स्थितीत असल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास होत आहे. येथे अपघाताच्या अनेक घटना घडत असून अर्धवट कामामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर (Raod) चिखल साचत असून अनेक वाहने रस्त्यात बंद पडण्याच्या घटनाही घडतात. रस्त्याचे काम पूर्ण करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी म्हणून रस्त्याची दुरुस्ती केली जाते, तेही पावसाळ्यात सगळे वाहून जाते. रस्त्याच्या बाजूने कामासाठी आणून ठेवलेली खडी विखुरलेली आहे, तर काही ठिकाणी खोदकाम केल्याने मोठे खड्डेही रस्त्यावर (Raod) आहेत. या सगळ्यातून मार्ग काढत जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून कुणालाही या समस्येकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याचे दिसत आहे.
Join Our WhatsApp Community