राज्य समाईक परीक्षा कक्ष सीईटी सेल तर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी पीसीएम- पीसीबी २०२४ चा निकाल केव्हा जाहीर हाेणार ? यासाठी गत एक आठवड्यापासून उमेदवार आणि पालक वाट पाहत हाेते. अखेर निकालाची प्रतिक्षा संपली असून सीईटी सेल तर्फे रविवार दि. १६ जून राेजी सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात आला. तर या निकालामध्ये राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. (MHT-CET Result 2024)
उमेदवारांना cetcell.mahacet.org/ आणि portal.maharashtracet.org/ या संकेतस्थळावर सहा नंतर निकाल पाहता आले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीए) गटासाठी ३ लाख १४ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ९५ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी नोंदणी केलेल्या ४ लाख १० हजार ३७७ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ९५ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. (MHT-CET Result 2024)
(हेही वाचा – Deep Sea Mission: खोल समुद्रात शोध मोहीम राबवणारा भारत ठरणार जगातील सहावा देश)
पीसीबी (PCB) आणि पीसीएम (PCM) गटातील मिळून एकूण ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. खुल्या प्रवर्गातील १८ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइलसह प्रथम क्रमांक मिळवला. ओबीसी प्रवर्गात शंभर पर्सेंटाइलसह आठ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अनुसूचित जाती प्रवर्गात मुंबईच्या परेश क्षेत्री, नागपूर येथील सना वानखेडे, अनुसूचित जमाती प्रवर्गात अकोला येथील सृजन अत्राम, रांची येथील सुयांश चौहान, विमुक्त जाती प्रवर्गात नाशिक येथील रिहान इनामदार, रांची येथील मंथन जाधव, भटक्या जमाती (ब) प्रवर्गात कोल्हापूर येथील सलोनी कराळे, पुणे येथील देवेश मोरे, भटक्या जमाती (क) प्रवर्गात ओम गोचाडे, वर्धा येथील प्रणव गावंड, भटक्या जमाती (ड) प्रवर्गात वर्धा येथील आराध्या सानप, जयपूर येथील समृद्धी ओंबासे अग्रस्थानी आहेत. एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. (MHT-CET Result 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community